शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या मजल्यावरून पडल्याने आराेपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

भिवंडी : गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीचा गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुंगारा ...

भिवंडी : गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीचा गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुंगारा देताना, इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याची घटना निजामपुरा-कसाईवाडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, पाेलिसांनी ढकलून दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्याने तणाव निर्माण झाला होता.

जमील कुरेशी (वय ३८, रा.कसाईवाडा) असे मृत आराेपीचे नाव आहे. जमील याच्यावर गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शुक्रवारी गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. जमीलच्या पत्नीने मारहाण करून, जमील याला पाेलिसांनी चाैथ्या मजल्यावरील खिडकीतून फेकून दिल्याचा आराेप केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला हाेता. त्यानंतर, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी धाव घेत, वातावरण नियंत्रणात आणले. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची नाेंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत जमील कुरेशी यास पकडण्यासाठी गुजरात पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस गेले हाेते. तेव्हा जमीलचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. यात कुणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.