शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

राम कापसे यांचा ‘तो’ औैचित्यभंगच

By admin | Updated: August 28, 2016 03:58 IST

निवडणुकीच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे आबासाहेब पटवारी यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे पक्षाच्या जिल्हा समितीने

डोंबिवली : निवडणुकीच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे आबासाहेब पटवारी यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे पक्षाच्या जिल्हा समितीने मान्य केले असून तशी शिफारस केल्याचे दिवंगत नेते राम कापसे यांनी स्वत: पटवारी यांना का सांगितले, ते अनाकलनीय आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राम कापसे यांच्याकडून झालेल्या औचित्यभंगावर शनिवारी बोट ठेवले.कापसे यांनी उमेदवारी पक्की झाल्याचे सांगितल्यामुळे पटवारी यांनी त्यांच्या परिचित व्यक्तींना ही वार्ता दिली. मात्र, जिल्हा ते दिल्लीपर्यंतचा पल्ला गाठेपर्यंत पटवारी यांचे नाव कट झाले. कापसे आता हयात नाहीत. त्यामुळे ते घडलेल्या घटनेचा खुलासा करू शकत नाहीत. मात्र, सकृतदर्शनी तरी पटवारी यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे कापसे यांनी जे काही सांगितले, ते मला अनुचित वाटते, असे नाईक म्हणाले.सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मनिवेदनपर पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. अशोक कुकडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, दिलीप करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल नाईक यांनी सांगितले की, आबासाहेबांंनी आपल्या पुस्तकात अनेक उल्लेख केले आहेत. ते मी चार तास खर्च करून वाचले. त्यात निवडणुकीचा व उमेदवारीचा उल्लेखही आला आहे. उमेदवारी देणे अथवा नाकारणे, हा सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे. तरीदेखील काम करीत राहणाऱ्याचे कधीही नुकसान होत नाही. त्याचा प्रत्यय ‘सहस्रचंद्रदर्शन’ यातून येत आहे. लोकमान्य टिळकांनी जशी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले, त्याच धर्तीवर पटवारी यांनी नववर्ष स्वागतयात्रा सुरू केली. याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.स्रेही असूनही २९व्या क्रमांकावरमी पटवारी यांचा स्नेही आहे. मात्र, पुस्तकात त्यांनी माझा कुठेही उल्लेख केलेला नाही. ज्यांचा पुस्तकात उल्लेख करणे शक्य नाही, त्याची नामावली पटवारी यांनी शेवटी दिली आहे. त्या नावांतील माझे नाव २९ व्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व माझे मार्गदर्शन असा त्यांनी उल्लेख केलेला पाहून बरे वाटले, असे बोलून नाईक यांनी पटवारी यांनाही कोपरखळी दिली.