मीरा रोड : शहरात आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणारे बेकायदा नृत्य व अश्लील प्रकारांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्र वारी रात्री चार आॅर्केस्ट्रा बारवर छापे टाकून ४० जणांना अटक केली, तर १६ बारबालांची सुटका करण्यात आली.शहरातील आॅर्केस्ट्रा बार, लॉजमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्रास अनैतिक व्यवसाय चालत आहेत. वारंवार छापे टाकूनही असे प्रकार सुरू आहेत. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी रुजू होताच डॉ. महेश पाटील यांनी आॅर्केस्ट्रा बारविरु द्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याआधारे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनीही मोहीम हाती घेतली आहे. बावचे व त्यांच्या पथकाने शुक्र वारी रात्री काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन बारवर छापे टाकले. त्यात ‘बिग बॉस’मधून १३ जणांना, ‘सी मेजिक’मधून नऊ तर ‘साकी’ बारमधून १० जणांना अटक करण्यात आली. शीतलनगरमध्ये असलेल्या ‘बिंदिया’ बारमधून आठ जणांना अटक करण्यात आली. अटक आरोपी हे बारचालक व कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)
मीरा रोडला ४ बारवर छापे
By admin | Updated: May 22, 2016 01:32 IST