शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार कोटी खर्चूनही प्रकल्प पीडितांच्या पाण्याचा प्रश्न भिजतच

By admin | Updated: August 30, 2016 02:25 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश येत असल्याने त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती करण्याची वेळ राज्यपाल राम नाईक यांच्यावर आली आहे.देशातील पहिला १ आणि २ अणुप्रकल्प सन १९६७ साली तारापूर येथे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत उभारण्यात आले. त्या नंतर अणु ऊर्जा प्रकल्प ३ आणि ४ च्या उभारणीसाठी अक्करपट्टी आणि पोफरण ही गावे स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचे राम नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन ही करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने न पाळता त्यांना बळजबरीने हलविण्यात आले असे राम नाईकांनी सांगितले. त्या मुळे आपल्या अधिकारासाठी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पर्यंत १२ वर्षाच्या कालावधीत ६० पेक्षा अधिक वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र शासनाच्या पुनर्वसन खात्याचे अधिकारी या प्रकरणात लक्ष देत नसल्याने प्रकल्पग्रस्त पिण्याच्या पाण्यासारख्या साध्या सोयीपासून आज वंचित आहेत. अशा वेळी केंद्रात आणि राज्यात राम नाईकांचा भाजपा हा प्रमुख पक्ष दोन वर्षापासून सत्तेत असतांना प्रकल्पग्रस्तांवर अशी पाळी का ओढवली जाते आणि हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना का विनंती करावी लागते ? हा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन हा राम नाईक यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून १२५० प्रकल्प पीडित ग्रामस्थ आपल्या अधिकारासाठी सन २००४ पासून उच्च न्यायालयात गेले असताना राम नाईक ही त्यांच्या याचिकेत सहभागी झाले होते. मात्र आता ते उत्तर प्रदेश चे राज्यपाल असल्याने घटनात्मक जबाबदारी मुळे आपण न्यायालयीन कामात सहभागी होऊ शकत नाही असे सांगून ते तूर्तास बाजूला झाले आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले असून पाणी,गटारे,आरोग्य सेवे सारख्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठीही प्रकल्पग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे हे खूपच वेदनादायी आहे. प्रकल्प उभारतांना स्थानिकांनी दाखविलेले मोठे मन सरकारने विसरु नये.(वार्ताहर)