लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कुत्र्याच्या पिलाला धडक देऊन त्याच्या उजव्या पायाला गंभीररीत्या दुखापत केल्याच्या आरोपावरून वर्तकनगर पोलिसांनी एका कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही.ठाणे, वसंत फ्युओना सोसायटीत राहणारे ललीत परब यांनी दिलेल्या तक्रारीत हा प्रकार त्यांच्या सोसायटीबाहेर सार्वजनिक रोडवर ११ एप्रिल २०१७ रोजी घडला होता. एका कारचालकाने भरधाव वेगाने कार पाठीमागे घेताना, कारच्या चाकाखाली कुत्र्याचे पिलू आले. तसेच ते पिलू ओरडत असतानाही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याच्या उजव्या पायाला गंभीररीत्या दुखापत केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी, परब यांनी ५ मे रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिलेल्या तक्रारीनुसार कारचालकाविरोधात मोटार वाहन कायदा आणि प्राण्यांना क्रूर वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एल. भापकर करीत आहेत.
कुत्र्याच्या पिलाला धडक; चालकावर गुन्हा
By admin | Updated: May 7, 2017 05:51 IST