शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तरतूद हवी

By admin | Updated: March 10, 2017 04:11 IST

ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते.

ठाणे : ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते. ते रोखायचे असेल तर पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी अपेक्षा ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी मुख्य अधिकारी गिरीश मेहेंदळे यांनी व्यक्त केले.गळती रोखावी, मीटर पध्दतीने पाणीपुरवठा सुरु करावा. वॉटर, एनर्जी आॅडिटची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, असा आग्रहही त्यांनी धरला. पालिकेने पाणीबिलाची वसुली मीटरप्रमाणेच करावी. मीटर पद्धतीमुळे पाण्याच्या नियोजनास मदत होईल. याशिवाय पाणी येते किती, वापरले जाते किती, याचे नोंद सुरू करावी. एकूणच पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे असण्यावर त्यांचा भर होता. पाणी बिलाच्या वसुलीचे कामही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून न करता किंवा पाणी मीटरचे काम, वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट हे पालिकेकडून न करता ते आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्यास त्यामुळे उत्पन्न वाढेल; शिवाय पाण्याच्या नियोजनास मदत होईल, असे मेहेंदळे म्हणाले. पाणीपुरवठा विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी निधी लागतो. त्याची तरतूद अर्थसंकल्पात नसते. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी त्यासाठी भरीव तरतूद केल्यास दुरुस्तीची कामे वेळेत होऊन गळतीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. त्याचा वाढलेला खर्च पाहता आता पालिकेला हे धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे हे काम राज्य सरकारमार्फतच करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले. पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची उणीव भरुन काढण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी) पुरवठ्याचे नियोजन हवे : पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन हवे. कोणत्या भागाला महत्व दिले पाहिजे, कोणत्या भागाला कमी महत्व दिले जाणे अपेक्षित आहे, याचाही अभ्यास पुरवठ्यावेळी करणे गरजेचे आहे. या सर्वांसाठी निधी मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून फक्त उत्पन्नाची आशा न ठेवता, त्यांच्यासाठी विशेष तरतूदही करणे अपेक्षित आहे, असा आग्रह त्यांनी धरला.