शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

रक्षक हटविले, पेल्हार असुरक्षित

By admin | Updated: March 1, 2016 02:01 IST

नालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शशी करपे,  वसईनालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. धरणात जिलेटीनचा स्फोट घडवून खुलेआम मासेमारी सुरु आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. कपल्सचा रोमान्स वाढला आहे. तबेल्यांनी अतिक्रमण करून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गोडाऊन बनवले आहे. यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली असून शहराच्या पाणीपुरवठ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मातीचे पाझर धरण चारही नगरपालिकांनी २००१ साली आपल्या ताब्यात घेऊन त्याचे मजबूतीकरण केले होते. या धरणातून नालासोपारा शहराला दररोज ७.२ एमएलडी तर वसई शहराला एकदिवस आड ७.२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पालिकेने ठेका पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर धरणावरील सहा सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आले आहेत. त्यानंतर याठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नाही. नालासोपारा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या घरात आहे, तर वसईची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने समाजकंटकांनी जर धरणाच्या पाण्यातूनं विषबाधा घडवून आणल्यास लाखो लोकांचा जीव धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धरणाचे मजबूतीकरण करण्यात आले असले तरी मासेमारी करणारे मोठ्या प्रमाणावर पात्रात जिलेटीनचे स्फोट घडवून आणत असल्याने त्याच्या हादऱ्याने धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे जिलेटीनचे स्फोट घडवले जात असताना दुसरीकडे आंघोळ, गुरे-ढोरे आणि धुणी भांडी धुतली जात असल्याने धरणातील पिण्याचे पाणी दूषित होत असून लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. या परिसरात आता पर्यटनाच्या नावाखाली खुलेआम पार्ट्या झडू लागल्या आहेत. कुणी हटकणारे नसल्याने या परीसरात तरुणाईच्या रोमान्सला ऊत आला आहे. धरणाच्या परिसरात शेकडो तबेले असून बहुतांशी बेकायदा आहेत. धरण परिसरात ठराविक अंतरावर बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. असे असताना तबेला मालक शेकडो बोअरवेल मारून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे मूळ पाझर तलाव असलेल्या धरणातील पाणी साठयावर परिणाम होऊन एप्रिल-मे महिन्यात त्यातील पाणीसाठा खूप कमी होत असतो. त्यामुळे नालासोपारा आणि वसई शहरातील पाणी पुरवठयावर परिणाम होऊन लोकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. धरणाचा परिसर तबेल्यातील घाणीने भरून गेलेला असतो. तबेल्यांनी धरणाच्या आणि सरकारी मालकीच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. आता धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या गंजी टाकून तो व्यापून टाकण्यात आला आहे.