शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या भरपाईचे दर फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:34 IST

समृद्धी महामार्गासाठी बाजारभावापेक्षा पाचपट दर देऊ असे जरी सरकार सांगत असले तरी सरकारने जाहीर केलेला भाव तसा नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/आसनगाव : समृद्धी महामार्गासाठी बाजारभावापेक्षा पाचपट दर देऊ असे जरी सरकार सांगत असले तरी सरकारने जाहीर केलेला भाव तसा नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते आहे. चर्चेलाही तयार नाही, असा आरोप करत या फसवणूक आणि दडपशाहीविरूद्ध शहापूर तालुक्यात गुरूवारी शेतकऱ्यांनी भर पावसात जेलभरो आंदोलन केले. त्यात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. शेतीची कामे सुरू असतानाही महिलांचा या आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. समृद्धी महमार्गासाठी सरकारतर्फे एकेका शेतकऱ्याशी वाटाघाटी करून, दडपशाही पद्धतींने जमिनी घेतल्या जात आहेत. त्याच्या निषेधार्थ संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केले. ‘रद्द करा, रद्द करा; समृद्धी महामार्ग रद्द करा,’ अशा घोषणा देत हाताला काळ््या रिबीनी बांधून शहापूरच्या बाजारपेठेतून आंदोलनकर्ते शहापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यासमोर जमले. तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निषेधाचे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. समितीचे समन्वयक बबन हरणे यांची शेतजमीन या महामार्गात जात नसल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसेच तालुक्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आल्याने स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आंदोलनापासून दूर राहिले. मात्र नंतर सर्वांनी आंदोलकासमोर भूमिका मांडली. जमिनीसाठी पाचपट वाढीव दर जाहीर केले आहेत. ते फसवे आहेत. बाजारभावाएवढीच रक्कम मिळत असेल तर सरकार पाचपट अधिक भाव दिल्याचा दावा कसा करू शकते? असा सवाल पवार, विद्याताई वेखंडे यांनी केला. शहापूर तालुक्यातील ८५ टक्के शेतकऱ्यांच्या हरकती असतील, तर सात गावातील ३२३ शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा फसवा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पालगतच्या मेगासिटीमुळे शेतकरी भूमिहीन होउन शेती संपुष्टात येईल, याचा पुनरूच्चार बबन हरणे यांनी केला. आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्यातील या प्रकल्पाविरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले. जमीन खरेदीसाठी येणारा कोणताही दलाल अथवा ठेकेदाराच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन अपर्णा खाडे यांनी केले.