शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराचा बोजा ४५ कोटींचा

By admin | Updated: January 24, 2017 05:51 IST

शहरातील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात माफी, तर ७०० चौ. फुटांच्या घरांना करात सवलत देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेमुळे

सदानंद नाईक / उल्हासनगरशहरातील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात माफी, तर ७०० चौ. फुटांच्या घरांना करात सवलत देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर ४५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ताकरात माफी व सवलत देण्याची घोषणा केली. महापालिका क्षेत्रात २ लाख मालमत्ताधारक असून त्यापैकी ९० हजार मालमत्ता ५०० फुटांच्या आतील आहेत. त्यांच्याकडून वर्षाला ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ताकर वसूल होत असल्याची माहिती करसंकलन विभागाने दिली. महापालिकेकडे मालमत्ताकर व एलबीटीचा शासन निधी हे दोन उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर सुविधा पुरवण्यात येतात. निधीअभावी अनेक विकासकामे ठप्प पडली असून इतर विकासकामे खासदार, आमदार यांच्या निधीसह शासनाच्या अनुदानातून केली जात आहे. ३५० कोटींची मालमत्ताकर थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी करवसुली विभागाचा पदभार दादा पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने सर्वच थकबाकीधारकांना नोटिसा पाठवून कर भरण्याचे आवाहन केले. तसेच २५० पेक्षा जास्त मालमत्तेला सील ठोकून त्यांचा लिलाव करण्याची घोषणा केली. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत असतानाच करमाफी व करसवलत दिल्यास पालिकेने मोठे नुकसान होणार आहे.महापालिकेला स्थानिक संस्था करातून महिन्याला १६ कोटींचे उत्पन्न मिळत होते. जकात बंद होऊन एलबीटीकर लागू झाला. तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी जकातीपेक्षा जास्त उत्पन्नाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप व पालिका अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे दरमहा सरासरी ८ कोटींपेक्षा जास्त एलबीटी वसूल झाली नाही. अपवाद केवळ तत्कालीन उपायुक्त प्रकाश कुकरेजा यांचा. त्यांनी एलबीटी उत्पन्न १३ कोटींवर नेले होते. वर्षाला १०० कोटी, तर एकूण २५० कोटींचे नुकसान एलबीटीमुळे झाले आहे. शासनानेही एलबीटीऐवजी दिलेला निधी अपुरा असल्याची मागणी होत आहे.