शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्याेदय’चे अध्यक्ष, सचिव बडतर्फ

By admin | Updated: August 6, 2015 02:54 IST

महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याचा ठपका ठेवून येथील सूर्याेदय को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची

बदलापूर : महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याचा ठपका ठेवून येथील सूर्याेदय को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी आणि सचिव नरेंद्र काळे यांना आपल्या पदांपासून दूर राहावे लागणार आहे.अंबरनाथ पूर्व भागात १०० एकर जागेवर ६३० प्लॉटची सूर्याेदय सोसायटी उभारण्यात आली होती. स्थापनेच्या वेळी ती आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून नावारूपाला आली. मात्र, तिच्या प्लॉटधारकांनी शर्तभंग करून या जागेवर इमारती उभारल्या होत्या. त्यामुळे या सोसायटीच्या जागेवरील खरेदीविक्री व्यवहारावर शासनाचे निर्बंध आहेत. हा विषय सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता सोसायटीच्या कामकाजावरच आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार सूर्याेदय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुदतीत घेणे, हे संस्थेला बंधनकारक होते. मात्र, संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी १४ आॅगस्ट २०१२ पूर्वी कार्यालयाकडून रीतसर मुदतवाढ घेतली नाही. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या आदेशाविरोधात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना सोसायटीच्या अध्यक्ष शेट्टी आणि सचिव काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक एल.एस. लष्कर यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या पदांसाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे शेट्टी आणि काळे यांना आपल्या पदांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.यासंदर्भात नरेंद्र काळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमचे पद काढण्यात आले असले तरी कमिटीचे सदस्य म्हणून आम्ही कायम राहणार आहोत. (प्रतिनिधी)