शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खबरदारी म्हणून कोविड सेंटर राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनपा प्रशासनाने खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल येथे कोविड सेंटर सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनपा प्रशासनाने खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल येथे कोविड सेंटर सुरू केले. सध्या शहरात रुग्णसंख्या कमी असून, या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्ण नाहीत; मात्र खबरदारी म्हणून सेंटर, वैद्यकीय मनुष्यबळ कायम ठेवण्यात येणार आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत शहरात फक्त २८ रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर शनिवारी अवघ्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. भिवंडीचा विचार केल्यास शहरात आतापर्यंत १० हजार ६०२ रुग्णांची नोंद झाली असून, १० हजार ११२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर ४६२ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील रुग्णासंख्या कमी झाल्याने मृत्युदरही कमी झाला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८३५ दिवसांवर गेला आहे.

मनपा प्रशासनाच्या वतीने धोबीतलाव परिसरातील खुदाबक्ष हॉल येथे १३० बेडचे, तर कामतघर येथील वऱ्हाळादेवी मंगल कार्यालय कोविड सेंटर येथे १३० बेडचे असे २६० बेडचे कोविड सेंटर उभारले आहेत, तर शहरात २३ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली असून, या २३ खासगी रुग्णालयांमध्ये साधारणत: ६१२ बेड उपलब्ध आहेत.