शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरमधील सहकार महर्षींना धक्का

By admin | Updated: December 23, 2015 00:33 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत विविध स्वरूपांच्या सुमारे ३२ हजार सहकारी संस्थांची कागदोपत्री नोंद आहे.

सुरेश लोखंडे,  ठाणेठाणे आणि पालघर जिल्ह्यांत विविध स्वरूपांच्या सुमारे ३२ हजार सहकारी संस्थांची कागदोपत्री नोंद आहे. परंतु, जिल्हा उपनिबंधक विभागाच्या सर्वेक्षणात सुमारे चार हजार १३२ संस्था बेपत्ता असल्याच्या आढळल्या आहेत. चार हजारांपेक्षा जास्त संस्था असलेली सहकार क्षेत्रातील ही व्होट बँक बुडीत निघाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील तथाकथित सहकार महर्षींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १८ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. परंतु, ३२ हजार सहकारी संस्थांपैकी चार हजार १३२ संस्थांचे ठिकठिकाणच्या पत्त्यांवरील कार्य बंद असल्याचे आढळले. यामध्ये सर्वाधिक सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी अस्तित्वात असल्याचा दावा जरी केला असला तरी तपासणी अहवालात आणि दर वर्षाचा वार्षिक आॅडिट अहवाल देण्यासाठी या बेपत्ता संस्थाचा कस लागणार आहे. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, कृषी बाजार समिती, एमपीएमसी मार्केट, यासारख्या अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांना संस्थांच्या अध्यक्षांना मतदानाचा हक्क असतो. प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार ठिकठिकाणांहून बेपत्ता संस्थाऐनवेळी ठराव घेऊन अध्यक्षांना मतदानाची संधी देतात की काय, असा गंभीर संशय जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. जर तसे होत असेल तर या बुडीत व्होट बँकेमुळे सहकार महर्षींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या या संस्थांचा शोध संबंधित पत्त्यांवर घेतल्यानंतरही त्या आढळल्या नाहीत. नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांच्या पत्त्यांवर अन्य संस्थांच्या इमारती मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्यात मूळ संस्था निश्चित करता येत नाही. संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अस्तित्वाच्या दृष्टीने संपर्क साधला नाही. या तीन हजार गृहनिर्माण संस्थांसह पतसंस्था, शेतीसंस्था, आदिवासी, भात गिरणी, ग्राहक, औद्योगिक, मजूर, मच्छीमार, दुग्ध, जंगल कामगार, पगारदार आदी सुमारे १८ स्वरूपांतील एक हजार संस्थांचा सहभाग आहे.