शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जावेने जावेवर उकळता चहा ओतला

By admin | Updated: May 23, 2017 01:53 IST

मासे सुकवण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात धाकट्या जावेने मोठ्या जावेच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना उत्तन परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मासे सुकवण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात धाकट्या जावेने मोठ्या जावेच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना उत्तन परिसरात घडली. धाकट्या जावेविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक झालेली नाही. उत्तनच्या नवीखाडी येथे रेनी मलेकर व सिडनी मलेकर हे मच्छीमार भाऊ एकाच घरात राहतात. कौटुंबिक भांडणामुळे दोन चुली आहेत. १९ मे रोजी सायंकाळी रेनीची पत्नी लिडवीना (४६) ही मुलगी लिंसीया (२२) सोबत मासे सुकवण्यासाठी गेल्या होत्या. लिडवीना ह्या रेनीच्या काकांच्या जागेत मासे सुकवत असताना सिडनीची पत्नी लिया आली व मला मासे सुकवायचे आहेत सांगून हुज्जत घालू लागली. लिंसीयाने आईला घरी जाण्यास सांगितले असता लिडवीना घरी आल्या. पाठोपाठ लिया सुध्दा आली. दोघींनी त्यांच्या वेगवेगळ्या गॅस शेगडीवर चहा ठेवला. दरम्यान लियाने आमच्या जागेवर मासे का सुकवायला टाकले म्हणून लिडवीना हिला शिविगाळ व धक्काबुक्की केली. त्याच रागात लियाने गॅसवर उकळत असलेला चहा लिडवीनाच्या चेहऱ्यावर ओतला. उकळता चहा तोंडावर पडल्याने लिडविना जखमी झाली असता तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. उत्तन पोलिसांनी लिया विरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक सरोजना मोकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक डी.आर.चेल्ले तपास करत आहेत. अशाप्रकारे क्रूरपणे वागणाऱ्या लिया हीला अद्याप अटक केली नसल्याने लिडवीना व कुटुंबियांनी त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.