शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८४ हजार ४५६ परमीटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ २३ हजार ३०६ रिक्षाचालकांनी दीड हजार रुपयांच्या ...

ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८४ हजार ४५६ परमीटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ २३ हजार ३०६ रिक्षाचालकांनी दीड हजार रुपयांच्या अनुदानासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अर्ज केला आहे. ज्यांना बँक खात्याची समस्या असेल त्यांना न्यूनतम ठेव नसतानाही खाते उघडण्याची संधी आता भारतीय डाक विभागाने दिली आहे. याचा अनेक रिक्षाचालकांना फायदा होणार असल्याची माहिती ठाणे आरटीओने दिली.

आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरुवातही झाली आहे; मात्र उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची बाब समोर आली. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ठाणे विभागात ८४ हजार ४५६ पैकी २३ हजार ३०६ परमिटधारक रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. त्यातील १७ हजार मंजूर झाले असून सात हजार चालकांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उर्वरित काही रिक्षाचालकांना आधारकार्ड तसेच बँक खात्याची समस्या आहे. त्यामुळे आरटीओने यापूर्वीच दोन आधार केंद्र सुरू केले. आता १६ जूनपासून भारतीय डाक कार्यालयाच्या मदतीने आरटीओ ठाणे कार्यालयाच्या आवारात रिक्षाचालकांसाठी खास बँक खाते सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे आणि जयंत पाटील यांनी डाक कार्यालयात तशी मागणी केल्यानंतर डाक कार्यालयाने ती मान्य करून आरटीओ कार्यालयाच्या आवारातच पोस्टाचेही केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बँकेची सुविधा नव्हती. त्यांचाही या अनुदानासाठी मार्ग आता मोकळा झाला आहे.