शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

टायरखरेदीसाठी आखडता हात

By admin | Updated: February 17, 2017 02:00 IST

एरव्ही कार्यक्रम वा अन्य तातडीची गरज म्हणून आगाऊ रक्कम देणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेने टायरखरेदीसाठी मात्र हात आखडता

मीरा रोड : एरव्ही कार्यक्रम वा अन्य तातडीची गरज म्हणून आगाऊ रक्कम देणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेने टायरखरेदीसाठी मात्र हात आखडता घेतला आहे. तर, टायरखरेदीच्या तांत्रिक माहितीची निविदाही अद्याप उघडण्यात आलेली नाही. तर, दुसरीकडे टायरअभावी बस बंद पडण्याची संख्याही वाढत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून पालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. टायरची ६० हजार किलोमीटरपर्यंतची क्षमताही संपुष्टात आली आहे. यामुळे टायर फुटण्याचे, फाटण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु, पालिकेने टायरखरेदीसाठी चालवलेल्या या घोळात गेल्या वर्षीही टायरअभावी टप्प्याटप्प्याने १६ बस बंद पडल्या होत्या. पालिकेने टायरखरेदीची तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच ३६ टायरअभावी पुन्हा ६ बस बंंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. फेरनिविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर एकमेव आलेली निविदा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. आलेली निविदा उघडण्याचे पत्र परिवहन विभागाने संगणक विभागास दिले आहे. परंतु, आॅनलाइन निविदा उघडण्यासाठी दोन अधिकाऱ्यांनी डिजिटल लॉक उघडणे आवश्यक आहे. परंतु, सध्या उपायुक्त विजयकुमार म्हसाळ कामात व्यस्त असल्याने तांत्रिक माहितीची निविदाच अद्याप उघडलेली नाही. (प्रतिनिधी)