शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष मतदार यादीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या निरंतर पुनरिक्षण मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र मिळविण्यासाठी, दुबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या निरंतर पुनरिक्षण मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र मिळविण्यासाठी, दुबार किंवा समान नोंदी कमी करण्यासाठी, मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील राजकीय पक्षांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात लवकरच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी उपयुक्त ठरणारा मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे छायाचित्रांसह निर्दोष मतदार यादी प्रसिद्ध करणे, मतदान केंद्र सुसूत्रीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, छायाचित्र ३१ ऑक्टोबरपूर्वी तपासून घ्यावे. ज्यांची नावे आहेत मात्र छायाचित्र नाही किंवा तपासणीदरम्यान व्यक्ती त्या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये सहा लाख ११ हजार मतदारांचे छायाचित्र नाही. या छायाचित्र नसलेल्या याद्यांची जिल्ह्यात तपासणी केली जात आहे. या मतदारांनी आपले छायाचित्र उपलब्ध करून द्यावे. यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

या बैठकीला निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, शिवसेनेचे विलास जोशी, अनिल भोर, अमोल नवले, भारतीय जनता पक्षाचे कैलास म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नैनेश पाटणकर, बहुजन समाज पार्टीचे जमना कोरी आदी उपस्थित होते.

बीएलए नेमण्याच्या सूचना

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे, तेथे बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नेमण्याची कार्यवाही सर्व राजकीय पक्षांनी करावी, असे मार्गदर्शनही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.

-------------