शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र दाम्पत्याला पोलीस कोठडी

By admin | Updated: June 4, 2017 05:08 IST

चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटच्या समुद्र दाम्प्त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना शनिवारी कल्याण

- लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटच्या समुद्र दाम्प्त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना शनिवारी कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांनाही ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सात दिवसांत पोलीस त्यांच्याकडून कोणत्या स्वरूपाची माहिती मिळवतात, यावर या तपासाची दिशा निश्चित होणार आहे. सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये बदलापूरसह अनेक शहरांतील गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले आहेत. हा आकडा ४०० कोटींच्या वर आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करून ‘सागर’चे प्रमुख सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र यांनी त्यांचे पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही समुद्र दाम्पत्य पोलिसांना तपासात सहकार्य करत होते. मात्र, गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक होत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये संताप होता. अखेर, ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुनीता समुद्र आणि मध्यरात्री सुहास समुद्र यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समुद्र दाम्पत्याला अटक झाल्यावर गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी केली. याप्रकरणातील आणखी एक आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. - या प्रकरणात नगरसेवक शैलेश वडनेरे हे पोलिसांकडे पाठपुरावा करत आहेत. सुनीता आणि सुहास यांना अटक झाली असली तरी या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी श्रीराम समुद्र अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आला नाही.