शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

हल्ल्यांच्या घटनांमुळे स्कायवॉकवर पोलिसांची गस्त वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:47 IST

शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या दोघांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.

डोंबिवली : स्कायवॉकवरून उतरत असताना शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या दोघांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. तसेच २२ मार्चला सायंकाळी केडीएमसीचे डोंबिवलीतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी शस्त्राने हल्ला चढविला होता. वाढत्या हल्ल्यांच्या घटना विचारात घेऊन आता पोलिसांनी तेथे रात्रीच्या सुमारास गस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्कायवॉकवर बुधवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.या घटनेमुळे पुन्हा रामनगर पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.ठाण्यात राहणारे पाटील हे सायंकाळी कार्यालयातून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ते महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून निघाल्यावर स्कायवॉकने डोंबिवली स्थानकाकडे जात होते. त्यावेळी पाटकर रोडवरील स्कायवॉकवर दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर पेनसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पाटील यांच्या पोटावर, छातीवर, े पाच ते सहा वार झाले होते. पाटील यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेल्याने त्यांचे प्राण वाचले.