शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने फिलोमिनाला भेटले प्रियजन

By admin | Updated: May 9, 2017 00:19 IST

मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील एका मुलीला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहचविले आहे.

आरिफ पटेल । लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील एका मुलीला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहचविले आहे. मनोर मस्ताननाका रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास एक मुलगी नदी जवळ गस्त घालणारे पो उप नि पंकज पाटील यांना आढळली त्यांनी तिला जीप मध्ये बसवून हलोली येथील स्वागत आश्रम मध्ये नेले. तिची अवस्था दयनीय होती तेथील व्यवस्थापक नारकर यांनी तिची विचारपूस करून तिचा पत्ता, नाव जाणून घेतले. व ते पोलिसांना कळविले. त्या नंतर स पो नि मनोज चाळके यांनी आसाम राज्यातील जिल्हा उडालउडी होरिसंगा पोलीस ठाण्यात शोध घेतला व तेथील पो नि गोगई यांना खबर दिली त्या वरून तेथील बचपन बचाव संस्थच्या माध्यमातून कोरामुळं गावातील तिच्या घरचा पत्ता मिळाला. त्यानंतर तेथील बचपन बचाव संस्थेचे सदस्य फ्रांगलिंक डिगल व आनंद इक्का हे मनोर पोलीस ठाण्यात आले. त्या नंतर त्यांना स्वागत आश्रम हलोली येथे नेले तेथील व्यवस्थापक नितीन नारकर यांची भेट घालून दिली त्यांनी फिलोमीनाशी भेट घालून दिली असता यावेळी आसामी भाषेत झालेल्या संवादातून ओळख पटली त्यांच्या ताब्यात तिला देण्यात आले ती आता आपल्या घरी सुखरूप पाहोचली आहे फिलोमीना हिच्याशी बातचीत केली असता ती म्हणाली आमचा परिसर खूप गरीब आहे चांगले काम देतो असे सांगून एका व्यक्तिने येथे आणले व तो पळून गेला त्यामुळे मला इकडचे काहीच समजत नव्हते. मी वेडी झाले होते रस्त्यावर फिरत होते मला रात्री पोलिसांनी आश्रमामध्ये आणले. मला नारकर यांनी जेवण दिले आंघोळ केल्यावर कपडे बदलल्यावर मी भानावर आले त्यांना व पोलिसांना माहिती दिली त्यांनी माझ्या गावाचा शोध लावून मला पुन्हा माझा कुटुंबात नेले त्या सर्वांना मी खूप धन्यवाद देतेमनोर पोलीस ठाण्याचे पो उप नि पंकज पाटील यांनी माणुसकीचे नातें दाखवून तिला आपल्या गावी, आपल्या घरी पठवण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल त्यांचे मनोर परिसरात कौतुक होते आहे.