लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : मद्यपी आरोपीने अंबरनाथ पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सोमवारी रात्री आरोपी राजन वेलू याच्याविरुद्ध वैशाली गाडगे यांनी छेडछाड करण्याची तक्रार दिली होती. आरोपीविरोधात पोलीस गुन्हा दाखल करीत असताना दारूच्या नशेत असलेल्या राजन याने पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे यांना लाथा मारून त्यांना खाली पाडले. त्या वेळी राजनला रोखण्याकरिता पुढे आलेल्या पोलीस नाईक निशिकांत रसाळ यांच्या पायाला त्याने चावा घेतला. राजनच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण
By admin | Updated: May 31, 2017 03:50 IST