शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:57 IST

प्रस्तावातील त्रुटींमुळे झाला संभ्रम; महापालिकेचे स्पष्टीकरण

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड अधिकृत करण्यासाठीचा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. त्यात ते कायमचे बंद केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी जागेवर असल्याने ते बंद करण्यासाठीच हा फेरबदलाचा प्रस्ताव आणल्याचे स्पष्ट केले आहे. याठिकाणी यापूर्वी जशी जागा होती, तशीच जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी नियमानुसार सोपस्कार करणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी खेळाचे मैदान किंवा उद्यान विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक पाहता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून हा प्रस्ताव आल्याने त्यात त्याचा उल्लेख आल्याने तो झाल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ऐवजी महापालिका पर्पज असे आरक्षण करण्यात येणार असून तशाप्रकारचा बदल प्रस्तावामध्ये प्रशासनाकडून केला जाणार आहे. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची नैतिक जबाबदारी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत जुन्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १०० गुण असतात. त्यामुळे दिवा कचराभूमीवर जुन्या कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही तर स्वच्छ सर्व्हेक्षणातील गुण कमी होऊन शहराचा क्र मांक खालावेल. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केल्याचे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २0 पर्यंत पूर्ण करणार प्रकल्पदिवा कचराभूमीवर आतापर्यंत २३ लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्याची बायोमॉनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचºयामध्ये मिथेन आणि लिचेड असतो. यामुळे कचºयाला आग लागणे तसेच दुर्गंधी पसरते. या कचºयामधील प्रत्येक घटकांचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर त्याठिकाणी ती जागा पूर्वीप्रमाणेच अन्य वापरासाठी खुली केली जाते. यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच डायघर येथील कचºयाची विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचे काम सुरू असून तो डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dumpingकचरा