शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार वृक्षांची करणार लागवड

By admin | Updated: June 10, 2017 01:09 IST

अंबरनाथ तालुका पंचायत समिती या वर्षात २० हजार झाडांची लागवड व संवर्धन करणार आहे. गेल्या वर्षी पंचायत समितीने

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : अंबरनाथ तालुका पंचायत समिती या वर्षात २० हजार झाडांची लागवड व संवर्धन करणार आहे. गेल्या वर्षी पंचायत समितीने वृक्षारोपणाचे लक्ष्य पूर्ण केले होते. यंदाही लक्ष्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले. या वर्षी १७ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात २० हजार झाडांची लागवड करून संवर्धन करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात २८ ग्रामपंचायती, २२६ शाळा, ११५ अंगणवाड्या, ५ पशुवैद्यकीय दवाखाने याबरोबरच पाझर तलाव, आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्राच्या जागा आहेत. या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे तसेच संवर्धनाचे नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. काही ठिकाणी फळझाडेही लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व झाडे १८ महिन्यांची असून सात फूट उंचीची झाडे लावण्यात येणार आहेत. एकदा ही झाडे जगली की, वाढत जाणार आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धन सोपे होणार आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी निम्म्यापेक्षा अधिक झाडे जगलेली आहेत. गेल्या वर्षीच्या काही त्रुटींचा अभ्यास करून त्यात सुधारणा केल्याने या वर्षी लावण्यात येणारी बहुतांश झाडे जगणार असल्याचा दावा सोनटक्के यांनी केला आहे.