शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

स्मार्ट सिटीसाठी खर्च नियोजन द्या

By admin | Updated: May 24, 2017 00:59 IST

कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या कंपनीने खर्चाचे नियोजन सादर करावे, असा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या कंपनीने खर्चाचे नियोजन सादर करावे, असा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात चौथी बैठक पार पडली. याप्रसंगी मावळते महापालिका आयुक्त ई. रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, विरोध पक्षनेते प्रकाश भोईर, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सरकारने स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीकडे केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेले १३० कोटी रुपये पडून आहेत. या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी कंपनीला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाकरिता ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील आवश्यक खर्च किती आहे, त्या खर्चाचे नियोजन कशा प्रकारे असेल, हे नियोजन सादर करावे असे निर्देश मदान यांनी दिले. कोरीयन कंपनीसोबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. हा करार बैठकीत ठेवण्यात आला. नियमानुसार या करारावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. कंपनीकरीता ३० जणांचा कर्मचारीवर्ग लागणार आहे. तो भरती करण्यास मान्यता दिली गेली. प्रकल्पासाठी मुख्य सल्लागार म्हणून क्रिसीलची नेमणूक करण्यास मंजुरी दिली. महापालिकेने स्मार्ट सिटीचा २ हजार २३ कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. त्यामध्ये २८ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये सगळ््यात जास्त २० प्रकल्प हे ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’वर भर देणारे आहेत. उर्वरीत आठ प्रकल्प हे ‘पॅन सिटी’ आहेत. ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’ प्रकल्पात सर्वप्रथम कल्याण स्टेशनचा विकास होणार आहे. कल्याण स्टेशनच्या विकासाकरिता डिमीटस् कंपनीला सल्लागार नेमले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय सर्वोदय मॉलमध्ये थाटले जाणार आहे. वेगवेगळ््या कामांकरिता ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याला मंजूरी दिली गेली आहे. आता २८ प्रकल्पांसाठीही निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे मदान यांनी सूचित केले. यापूर्वी पार पडलेल्या बैठकीत मदान यांनी २८ प्रकल्पांची यादी ही कमी असून कमी कालावधी हे प्रकल्प पूर्ण करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.