शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मंगळागौर मंडळांचा पिंगा गं पोरी पिंगा

By admin | Updated: July 14, 2016 01:47 IST

श्रावण महिना सुरू व्हायला १५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी श्रावणात मंगळागौरचे खेळ सादर करणाऱ्या मंडळांच्या तालमी मात्र महिनाभरापूर्वीपासूनच सुरू झाल्या आहेत.

स्नेहा पावसकर,  ठाणेश्रावण महिना सुरू व्हायला १५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी श्रावणात मंगळागौरचे खेळ सादर करणाऱ्या मंडळांच्या तालमी मात्र महिनाभरापूर्वीपासूनच सुरू झाल्या आहेत. मंगळागौर खेळणारी ठाण्यात काही मोजकीच महिला मंडळे असली तरी विशेष म्हणजे ही मंडळे श्रावणासाठी आतापासूनच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांसह मोठ्या संस्थांच्या मागणीमुळे या खेळाला इव्हेंटचे स्वरूप येऊ लागले आहे.परंपरेनुसार चालत आलेला मंगळागौरीचा कार्यक्रम, त्यातील खेळ, त्याचे महत्त्व हे हल्लीच्या ग्लोबल आणि धकाधकीच्या आयुष्यात काळाआड होणार, अशी ओरड ज्येष्ठ वर्गाकडून ऐकायला मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत तरुण नोकरदार महिलाही मंगळागौर खेळणाऱ्या मंडळांत उत्साहाने सामील होत आहेत. यंदाही जून महिन्यापासूनच ठाण्यातील महिला मंडळांनी तालमींना सुरुवात केली आहे. श्रावण सुरू व्हायला १५ दिवस शिल्लक राहिले असल्याने तालमींना वेग आला आहे. झिम्मा, फुगडी, लाटण्यांचा खेळ, गाठोडं, होडी, पिंगा या पारंपरिक खेळांसोबतच यंदा डेक्कन क्वीन, सासर-माहेर अशा नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या काळानुसार पूजाअर्चेपेक्षा तरुणी मोबाइलवर चॅटिंगमध्ये दंग दिसतात. यावरच, संवादात्मक रूपात सासर-माहेर हा खेळ दिसणार आहे. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी एका मंडळाला साधारण ३ ठिकाणी कार्यक्रमांचे निमंत्रण असते. ही मंडळे एका कार्यक्रमासाठी सुमारे १० ते १५ हजार मानधन स्वीकारतात. प्रत्येक मंडळात साधारण १५-२० महिला असून त्यांच्या प्रवासाचा, खेळ सादर करताना लागणाऱ्या वस्तूंचा, खानपानाचा खर्च मानधनातून भागवला जातो.बदलत्या काळानुसार आता मंगळागौरीलाही हौसमौजेचं रूप येऊ लागले आहे. कामावरून दमूनभागून आल्यावरही या महिला रात्री एकमेकींच्या घरी खेळांचा सराव करतात. त्यानिमित्ताने कधी गप्पा रंगतात, तर कधी मिष्टान्न भोजनाचेही बेत आखले जातात. हे बदलते स्वरूप नवविवाहित वधूंनाही आवडत असल्याने त्यांचेही या मंडळांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती मेधा आघारकर यांनी दिली.