शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आज सायंकाळी प्रचाराला पूर्णविराम

By admin | Updated: February 19, 2017 04:18 IST

माघाची थंडी असूनही गेला महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले वातावरण आणि त्यानिमित्ताने जाहीर सभा, बैठका, रोड शो, चौक सभांच्या माध्यमातून सुरू असलेले

- स्नेहा पावसकर,  ठाणेमाघाची थंडी असूनही गेला महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले वातावरण आणि त्यानिमित्ताने जाहीर सभा, बैठका, रोड शो, चौक सभांच्या माध्यमातून सुरू असलेले शब्दांचे प्रहार अर्थात प्रचार तोफा रविवारी सायंकाळी थंडावतील. बहुतांशी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठाण्यात सभा झालेल्या आहेत. तरीही, प्रचाराचा शेवटचा दिवस आणि तोही रविवार आल्याने मात्र सर्वपक्षीय उमेदवार दिवसभर नॉन-स्टॉप जमके प्रचार करण्याच्या तयारीत आहेत.ठाण्यात अनेक इच्छुकांनी तिकीट मिळण्यापूर्वीच प्रभागांमध्ये प्रचार सुरू केला होता. तरीही, अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेले १५ दिवस उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या पाहायला मिळाल्या. पालिकेच्या निवडणुकीत ८०५ उमेदवार रिंगणात उतरलेले असले, तरी स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. उमेदवार हे प्रचारासाठी काही तास उरले असताना आता नेमक्या आणि आपली व्होट बँक मानल्या जाणाऱ्या विभागांमध्ये पुन्हा मतदारांना साद घालणार आहेत. तर, ज्यांना बहुतांशी मतदारांपर्यंत पोहोचता आलेले नाही, असे उमेदवार रविवारी दुपारची विश्रांती अथवा बैठका टाळून सकाळपासूनच सायंकाळपर्यंत नॉन स्टॉप प्रचार करणार आहेत. त्यासाठी त्यांनी विभागनिहाय नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर काही उमेदवार अधिकाधिक कार्यकर्त्यांना घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी घरातील पुरुष मंडळींबरोबरच स्त्रिया, तरुणवर्गालाही शेवटच्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांमार्फत केले जात आहे. त्यामुळे रविवारी उमेदवारांची दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी)स्क्रीनचे भाडे वाढले- ठाण्यात अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभा, चौक सभा, रोड शो यापूर्वीच झालेले आहेत. त्यामुळे ज्या विभागांमध्ये उमेदवारांना पुन्हा जाता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी नेत्यांची भाषणे एलईडी स्क्रीनवर सुरू असलेले रिक्षा-टेम्पो फिरताना दिसत आहेत.- रविवारी अधिकाधिक विभागांमध्ये एलईडी स्क्रीनवरील भाषणेही मतदारांच्या कानी पडतील. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी काही उमेदवारांनी डेकोरेटर्सकडून एलईडी मोठ्या प्रमाणात भाड्याने घेतलेले असून त्याचे एका दिवसाचे भाडे किमान ५ ते ७ हजारांनी वाढले आहे.