शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेले वर्षभर कोरोनाचा कहर सुरू असून, ठाण्यातील चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेले वर्षभर कोरोनाचा कहर सुरू असून, ठाण्यातील चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारी माणसे या महामारीपासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सुमारे ४९ पैकी केवळ दोनचजणांना सुरुवातीच्या काळात कोरोना झाला होता. परंतु, त्यानंतर अद्याप एकालाही त्याची लागण झालेली नाही. असे असतानाही एखाद्या घरच्याप्रमाणेच कोरोनाग्रस्तांवर ते अंत्यसंस्कार करीत आहेत.

ठाणे शहरात आजघडीला ६८ हजार ८५२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ६३ हजार २०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर आतापर्यंत एक हजार ४२६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरीदेखील मनात भीती कायम आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ५४ च्या आसपास स्मशानभूमी आहेत. त्यातील वागळे, जवाहरबाग, कळवा आणि येऊर येथे असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यातही जवाहरबाग स्मशानभूमी ही ठाण्यातील सर्वात मोठी असल्याने तिथे अंत्यविधीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे येथे तीन शिफ्टमध्ये २४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर वागळे, कळवा येथे १२ आणि येऊर येथे एक कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांच्या खांद्यावर कोरोनाला सुरुवात झाल्यापासून मोठी जबाबदारी पडली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला उचलण्यापासून त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीदेखील त्यांच्याच खांद्यावर आहे. हे करीत असताना स्वत:च्या जिवाची काळजी घेण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे.

परंतु, एखाद्यावर अंत्यसंस्कार करताना जो आपल्या घरातीलच असल्याचेसारखे अगदी रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले जात आहेत. त्यामुळे अनेकांची मनेदेखील यामुळे पिळवटून निघाली आहेत. परंतु, मनावर दगड ठेवून ते आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यातूनच वर्षभरात केवळ दोनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, वारंवार हात सॅनिटाईज करणे आदी काळजी हे कर्मचारी घेत आहेत. तसेच घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे आणि घरी गेल्यानंतरही पुन्हा गरम पाण्याने अंघोळ करणे असा दिनक्रम या कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. परंतु, घरातदेखील सर्वांपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच ते वास्तव्य करीत असल्याचे सांगतात.

शहरातील स्मशानभूमी - एकूण ५४,

कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार - ४ स्मशानभूमी

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांची संख्या - ४९

आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह - ०२

आम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर रितसर अंत्यसंस्कार करीत असतो. ते करीत असताना कधीकधी मन घट्ट करावे लागते. तसेच आमच्या घरच्यांसह स्वत:चीदेखील काळजी घेतो. अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे तसेच घरी गेल्यानंतरही पुन्हा अंघोळ करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घरात वावरणे, असा नित्यक्रम ठरला आहे.

(जितू मकवाना - स्मशानभूमीतील कर्मचारी)