शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरकर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: February 14, 2017 02:45 IST

के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा

डोंबिवली : के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी सोमवारपासून राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.संघटनेचे पदाधिकारी चिमणलाल पराठे हे कॉलेजनजीक उपोषणाला बसले आहेत. दररोज एक जण, याप्रमाणे संघटनेचे ३५ सदस्य उपोषणाला बसणार आहेत. कॉलेजचा कारभार विद्यापीठाच्या नियमावलीनुसार चालत नाही. त्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. शिक्षक व शिक्षकेतरांना त्याचा त्रास होतो. याप्रकरणी संघटनेने राज्यपाल, संचालक आणि पोलीस आणि विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. विद्यापीठाकडून चौकशी झाली आहे. विद्यापीठाने व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, असा शेरा मारला आहे. त्याची अंमलबजवणी केली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेचे जवळपास पन्नासपेक्षा जास्त सभासद याप्रकरणी लढा देत आहेत. त्याला दाद मिळत नसल्याने हे उपोषण छेडण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप मेढे, सचिव सुवर्णा दांडकर उपस्थित होते.साखळी उपोषणाबाबत कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई म्हणाले की, संघटनेच्या सदस्यांना उपोषणाला बसण्याचा अधिकार नाही. कॉलेज प्रशासन व व्यवस्थापनाकडून कोणावरही अन्याय झालेला नाही. मंडळ बरखास्त करण्याची मागणी म्हणजे मालकाला बरखास्त करण्याची मागणी आहे. या संघटनेतील प्रमुख दोन व्यक्ती या महाविद्यालयात प्राचार्य आणि क्लार्कपदावर कामावर होते. त्यांना महाविद्यालयातून बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता ते आमचे कर्मचारी नाहीत. त्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. खालच्या न्यायालयात व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. या युनियनच्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायलयात गेलो असल्याने ते न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत आहेत. त्यांची मागणीच मुळात बेकायदा आहे. (प्रतिनिधी)