शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:53 IST

सरकारची अधिसूचना : अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश, भार्इंदर पालिकेच्या कारवाईकडे लागले लक्ष

धीरज परब।लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : सरकारने अधिसूचना काढून राज्यातील सर्व महापालिकांसह नगरपालिका, नगरपंचायतींसाठी घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणले आहेत. यामुळे ओला-सुका आणि घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास तसेच वेगळा करून न दिल्यास दंड आकारला जाणार आहे. या उपविधीनुसार बांधकाम कचरा (डेब्रिज) टाकणे, कचरा जाळणे, खुल्या जागेवर लघुशंका - प्रातर्विधी करणे, अंघोळ करणे, प्राणी-पक्षी यांना खाऊ घालणे आदींवर प्रतिबंध घातला आहे.

केंद्राच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम अमलात आणल्यानंतर एक वर्षाच्या आत नागरी स्वराज्य संस्थांनी उपविधी तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. परंतु, या संस्थांनी कार्यवाही न केल्याने गेल्यावर्षी सरकारने प्रारूप उपविधी प्रसिद्ध करून नागरी स्थानिक संस्थांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. त्या अनुषंगाने सरकारने १ जुलैपासून उपविधीची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित केली आहे.राज्यातील महापालिकांसाठी काढलेल्या अधिसूचनेतील मंजूर उपविधीनुसार यापुढे सार्वजनिक तसेच खाजगी जागेवर कचरा फेकणे तसेच ठेवण्यास मनाई केली आहे. वाहनांमधून प्रवास करताना बाहेर कचरा टाकल्यास कारवाई होणार आहे.डेब्रिज सार्वजनिक वा खाजगी जागेत टाकता येणार नाही. हा कचरा वेगळा ठेवून महापालिका वा त्याच्या कंत्राटदारामार्फत आवश्यक शुल्क भरून विल्हेवाट लावावी लागेल. बगिचा, फलोद्यान, फांद्यांच्या छाटणीचा कचरा शक्यतो त्याच ठिकाणी खतात रूपांतरित करणे आवश्यक आहे. महापालिकेनेही त्यासाठी आवश्यक संकलनव्यवस्था करायची आहे.कचरा निर्माण करणाºया प्रत्येकास कचरा गोळा करून पालिकेस शुल्क द्यावे लागेल. अ व ब वर्ग महापालिकेत प्रत्येक घरास महिना ६० रुपये, तर क आणि ड वर्ग महापालिकेतील प्रत्येक घरास महिना ५० रुपये शुल्क पालिकेस द्यावे लागणार आहे. फेरीवाल्यांना प्रतिमहिना अनुक्रमे १८० आणि १५० रुपये भरावे लागतील.याशिवाय विविध प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, धार्मिक संस्था, शोरूम, शैक्षणिक संस्था, विवाह कार्यालये, मल्टिफलेक्स, हॉटेल आदींनाही शुल्क द्यावे लागणार आहे. या शुल्कात दरवर्षी पाच टक्क्यांप्रमाणे वाढ होणार आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर पालिका प्रशासन गांभीर्याने कार्यवाही करणार का हा खरा प्रश्न आहे. नागरिक नियमांचे पालन करतात का हाही संशोधनाचा विषय आहे.

असा आकारला जाईल दंडओला व सुका कचरा तसेच धोकादायक कचरा हा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. कचरा वेगळा करून न दिल्यास अ व ब वर्ग महापालिकेतील नागरिकांना पहिल्या वेळी ३०० रु. व त्यानंतर ५०० रु. दंड आकारला जाणार आहे. क व ड वर्ग महापालिकेतील घरमालकास पहिल्या वेळी २०० रु. व त्यानंतर ३०० रु. इतका दंड भरावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून तीन हजारांपासून १५ हजारांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे. कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याचे उल्लंघन करून कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे.