शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दाेन मंगल कार्यालयांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST

उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दोन मंगल कार्यालयांवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी ...

उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दोन मंगल कार्यालयांवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी ४० हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईने मंगल कार्यालये, चित्रपटगृह, मॉल, दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला आहे. या निर्बंधांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन गणेश शिंपी यांनी नागरिकांना केले आहे.

उल्हासनगरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये लग्नसभारंभाला ५० जणांना, तर अंत्यसंस्काराला २० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक जण या निर्बंधांचे पालन करत नसल्याचे उघड झाले. कॅम्प नं. ३ परिसरातील मोनिका व हिरा मॅरेजचे व्यवस्थापक व लग्नसमारंभाला आलेल्या नवरा-नवरीकडील मंडळींसह लग्नात सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे उघड झाले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने रविवारी दोन्ही मंगल कार्यालयांना भेट दिली. कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवले जात असल्याचे दिसताच त्यांनी दंड ठाेठावला. कोरोना निर्बंधांचे अनेकजण पालन करत आहेत. मात्र काही जण त्याला गालबोट लावत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे दीपक छतलानी यांनी दिली.

कारवाई सुरूच ठेवणार : शिंपी

सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमानुसार कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनीही नागरिकांसह व्यापाऱ्यांनी कोरोनाचे निर्बंध पाळण्याचे आवाहन केले.