शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरती करताय, वेतन कोठून देणार?

By admin | Updated: January 9, 2017 07:32 IST

मनुष्यबळाअभावी केडीएमटी उपक्रमाच्या अनेक बस आगारात खितपत पडल्या असताना याचा परिणाम बसच्या संचालनावर झाला आहे.

कल्याण : मनुष्यबळाअभावी केडीएमटी उपक्रमाच्या अनेक बस आगारात खितपत पडल्या असताना याचा परिणाम बसच्या संचालनावर झाला आहे. यावर उपाय म्हणून कंत्राटी पद्धतीने चालक आणि वाहक भरती करण्याची प्रकिया सुरू झाली असली तरी या नवीन कर्मचाऱ्यांना वेतन देणार कोठून, असा यक्षप्रश्न उपक्रमासमोर उभा ठाकला आहे. केडीएमसीची सहकार्याची भूमिका असली, तरी आधीच्याच अनुदानाच्या तरतुदी पूर्ण करू न शकलेल्या या महापालिकेवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा सवालही उपस्थित होत आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत परिवहन उपक्रमाला १८५ बस मंजूर झाल्या असून मागीलवर्षी फेब्रुवारीत १० वातानुकूलित बस आणि आॅगस्टमध्ये ६० बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. उर्वरित १०५ बस लवकरच उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होतील, असा दावा केडीएमटी प्रशासनाचा आहे. उपक्रमाच्या ताफ्यात पूर्वीपासून दाखल असलेल्या १०० बसकरिता व १० वातानुकूलित बससाठी चालक अपुरे पडत असल्याने एकूणच बसच्या संचालनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, नव्याने दाखल होत असलेल्या बस आणि ताफ्यातील जुन्या बसकरिता चालक आणि वाहक भरती करण्याच्या अनुषंगाने सरकारी निर्णयानुसार कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय केडीएमटीने घेतला. त्यानुसार, १०० चालक आणि ४५० वाहकांची भरती करण्याच्या प्रस्तावाला डिसेंबरमधील महासभेत मान्यता देण्यात आली. आजच्या घडीला केडीएमटी उपक्रम सर्वस्वी महापालिकेवर अवलंबून आहे. मागील अंदाजपत्रकात परिवहन समितीने उपक्रमाला भांडवली खर्चासाठी २७ कोटींचे अनुदान मिळावे, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. परंतु, प्रशासनाने ती तरतूद २० कोटींवर आणली खरी, पण त्यातील केवळ ५ कोटी रूपयेच आजमितीला परिवहनला मिळाल्याची वस्तुस्थिती आहे. आज एका बसच्या माध्यमातून एका किलोमीटरमागे ४० रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र, खर्च हा ५५ रुपयांच्या आसपास होतो. ही येणारी तफावत भरून काढणे, ही संबंधित महापालिकेची जबाबदारी आहे, असा सरकारचा अध्यादेश आहे. परंतु, याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहनला दीड कोटीचे अनुदान दिले जाते. यातूनच थकीत देणी द्या, असेही सूचित केले जात असल्याने वेतनासाठीही हे अनुदान पुरेसे पडत नसल्याचे चित्र आहे. आजघडीला १० ते १२ कोटींची देणी असून यात देखभाल दुरुस्तीचाही समावेश आहे. याचा परिणाम बस नादुरुस्त होऊन त्याचा नाहक त्रास चालकांसह प्रवाशांना होत आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी सुमारे ३५ कोटींचे देणे आहे. (प्रतिनिधी)