शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक वेतनाचा प्रश्न पवारांकडे

By admin | Updated: June 22, 2017 00:05 IST

जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेऐवजी १ जुलैपासून ठाणे जनता सहकारी बँकेतून करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेऐवजी १ जुलैपासून ठाणे जनता सहकारी बँकेतून करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आता स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आणून बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत:च राज्य शासनाला जाब विचारणार आहेत. केवळ ठाणे जिल्ह्यासाठी आदेश काढून टीडीसीसी बँकेतील शिक्षकांचे वेतन टीजेएसबीत वळवण्याचे कारण काय, अशी विचारणा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी केला. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री मातोश्रीवर गेले असल्यामुळे पवारांचे त्वरित बोलणे झाले नाही. पण, काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे आश्वासन पवारांनी दिल्याचे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी लोकमतला सांगितले. आमदार पांडुरंग बरोरा यांनी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह पवार यांच्याकडे धाव घेऊन या अन्यायकारी निर्णयाविरोधात तक्रार केली आहे. महिनाकाठी सुमारे ७० कोटींपेक्षा जास्त रक्कम शिक्षकांच्या वेतनावर वाटप करणाऱ्या टीडीसीसी बँकेला शिक्षकांचे खाते सहजासहजी टीजेएसबीत वर्ग करायचे नाही. तसे झाल्यास वर्षानुवर्षे या मोठ्या बिझनेसचा तोटा लवकर भरून काढता येणार नाही, याची जाण ठेवून टीडीसीसीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे आदींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला असल्याचे सांगण्यात आले.