शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या पैशांवरून प्रवाशाला बेदम मारहाण

By admin | Updated: June 21, 2017 04:40 IST

रिक्षा भाड्यांच्या सुट्या पैशांवरून सहा रिक्षाचालकांनी इंजिनिअरला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गावदेवीत घडली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षा भाड्यांच्या सुट्या पैशांवरून सहा रिक्षाचालकांनी इंजिनिअरला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गावदेवीत घडली. त्याच्या मानेवर वळ उठले असून त्याला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने बराच मुकामार लागला आहे. ये-जा करणारे नागरिक वेळीच धावून आल्याने माझा जीव वाचल्याने त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी मोहम्मद शेख याला ताब्यात घेतले. या घटनेने ठाण्यातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी येथे राहणाऱ्या तुषार म्हात्रे (२३) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो दोन -तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका ठिकाणी कामावर रूजू झाला होता. वागळे इस्टेट, कामगार हॉस्पिटल येथून शेअर रिक्षाने तो घरी जात होता. रिक्षा गावदेवीला आल्यावर त्याने रिक्षाचालकाला ५- रूपये दिले. सुटे पैसे नसल्याने रिक्षाचालकाने शिवीगाळीस सुरूवात केली. सहप्रवासी मुलीला धक्काबुक्की करीत त्याने मलाही धक्काबुक्की केली. नंतर त्याने अन्य रिक्षाचालकांना बोलवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सहा जण माझ्यावर तुटून पडले. पण तेथून जाणाऱ्या नागरिकांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले. या मारहाणीत तुषारच्या मानेवर वळ उठले असून त्याला मुका मार लागला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही रिक्षा नेमकी कोणाच्या मालकीची होती, हे समजू शकले नाही. रिक्षेवर ठाण्यातील नेत्याचे चित्र रंगवल्याचे तुषारने सांगितले.