शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डमधील स्लॅबचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:55 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना; कोणीही जखमी नाही, प्रशासनाचा दावा

ठाणे : ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील वॉर्ड क्रमांक ५ मधील छताच्या स्लॅबचा काही भाग पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने हा भाग पडला तेंव्हा त्या परिसरात कोणी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ज्या टेबलावर तो पडला त्यामुळे त्या टेबलवरील काचेसह एक ट्युबलाईट फुटली असून पंख्याच्या पात्याही वाकल्या आहेत.रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर वॉर्ड क्रमांक पाच आहे. या वॉर्डतील कामकाज साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्यामुळे या वॉर्डमध्ये नेहमीच वर्दळ सुरू असते. सकाळी कर्मचारी येण्यास सुरुवात झाली होती. मात्र,जेंव्हा स्लॅबचा काही भाग पडला तेंव्हा आलेला एक कर्मचारी काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी स्लॅबचा काही भाग अचानक टेबलावरच पडला. त्याने जोरात आवाज होऊन त्याचे तुकडे सर्वत्र उडाले. अचानक पडलेल्या त्या भागामुळे टेबलवरील काच फुटली. तसेच ज्या ठिकाणचा भाग पडला तेथील ट्युबलाईट ही जोरात पडल्याने आवाज झाला. तसेच तेथे असलेल्या पंख्याच्या पात्या वाकल्या ंआहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून लवकरच येथून रुग्णालय स्थंलातरीत करावे, अशी कुजबुज आता कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. या मजल्यावर प्रसूती वॉर्ड असून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन आहे. तसेच ज्या वॉर्डच्या स्लॅबचा काही भाग पडला त्याच्यावरच जिल्हा शल्यचिकित्सकांचीही केबिन आहे.रुग्णालयाच्या एका वॉर्डमधील स्लॅबचा काही भाग पडल्याच्या वृत्तास दुजोरा देऊन, कोणीही या घटनेमध्ये जखमी झाले नाही. रुग्णालय स्थलांतराचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते स्थलांतरित होईल.- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे