शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्किंग प्लाझा’ला १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा मिळाला साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:05 IST

रुग्णांना माेठा दिलासा  : आयसीयूसह ऑक्सिजन बेड दोन दिवसांत होणार कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटरकरिता लिंडे कंपनीकडून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, येत्या दोन दिवसांत आयसीयु आणि ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत.ठाणे शहराला ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत तत्काळ संपर्क करून महापालिका प्रशासनाला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. याबाबत महापौर म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कंपनीकडून दररोज १५ टन ऑक्सिजन साठा प्राप्त होणार असून, गुरुवारी ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पार्किंग प्लाझामधील आयसीयु आणि ऑक्सिजन बेड टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णांसाठी जनकल्याण समिती पुरवणार ऑक्सिजनलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने त्या रुग्णांना रा. स्व. संघ, जनकल्याण समिती कल्याण जिल्ह्याच्या वतीने ऑक्सिजन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्येही बेड्स नाहीत. त्यामुळे समितीमार्फत कल्याण-डोंबिवली भागामध्ये होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याची सुविधा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. ज्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोना रिपोर्ट, सीटीस्कॅनचा रिपोर्ट, आधारकार्डची एक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन डाेंबिवली पूर्वेतील शासकीय प्रसूतिगृहासमाेरील घाणेकर बांगला येथे सकाळी ९ ते १, संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या