शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:48 IST

परीक्षेत नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको, तर तो सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. पण, हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन केले पाहिजे.

डोंबिवली: परीक्षेत नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको, तर तो सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. पण, हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन केले पाहिजे. त्यामुळे नुसत्या परीक्षेत तुम्ही यशस्वी होणार नाही, तर तुमची पुढील भावी वाटचालही यशस्वी होईल. मुख्य म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी आणि त्या दिशेने मुलांना पाठवायला पाहिजे, असा सल्ला भाजपा नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी दिला.प्रभाग क्र मांक-५९ च्या भाजपा नगरसेविका विद्या म्हात्रे यांनी प्रभागातील दहावीबारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि देशात सीएच्या परीक्षेत प्रथम आलेल्या राज शेठ याचाही सन्मान करण्यात आला. या वेळी बी.आर. हरणे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संचालक मंगेश हरणे, विश्वास भोईर, भाजपा कल्याण जिल्हा चिटणीस राजेश म्हात्रे, भाजपा महिला मोर्चाच्या ममता तावडे, माजी नगरसेविका रेखा असोदेकर, उद्योजक प्रदीप जोशी, भाजपा पदाधिकारी दिनेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.पाटील म्हणाले, पालक मुलांना महागडे क्लास लावत असतात. आपण कितीही महागडा क्लास लावला, तरी आपला पाल्य शाळेत-कॉलेजमध्ये शांतपणे ऐकतो का? प्रश्न विचारून आपल्या शंकांचे उत्तर मिळवतो का, हे सर्व पालकांनी जाणून घेतले पाहिजे.सगळे विद्यार्थी चांगलेच असतात. कोणाचीही गुणवत्ता कमी नसते, पण चिंतन-मनन करण्यात कमी पडतो, म्हणून टक्केवारी कमी होते. मुख्य म्हणजे, पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी आणि त्या दिशेने मुलांना पाठवायला पाहिजे. आज विविध क्षेत्र प्रत्येकासाठी वाट बघत आहेत. त्यासाठी आपण डोळस व्हायला पाहिजे, असे सांगितले.या गुणगौरव सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, अभ्यासात्मक वस्तूंचा सेट भेट म्हणून देण्यात आला. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी भोपतराव, सचिन चित्रे, प्रदीप चौधरी, सतीश देशपांडे, सुनील सामंत, सचिन दुर्वे, सुरेश जोशी, नमिता दोंदे, शारदा शिंदे, स्मिता जोशी, सुनीता कुरकुडे यांनी विशेष मेहनत घेतली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नमिता दोंदे यांनी केले.