शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पारधी यांची हत्याच

By admin | Updated: September 11, 2016 02:09 IST

वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संशयास्पद मृत्यु झालेल्या पोलीस शिपाई विनोद पारधी प्रकरणात वसई पोलीस ठाण्यात सात महिन्यानंतर अज्ञात आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला

वसई : वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संशयास्पद मृत्यु झालेल्या पोलीस शिपाई विनोद पारधी प्रकरणात वसई पोलीस ठाण्यात सात महिन्यानंतर अज्ञात आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाचुबंदर खाडीत वसई पोलीसांना ७ फेबु्रवारी २०१६ रोजी विनोद पारधी यांचा मृतदेह मिळाला होता.वसई पोलीस वसाहतीत पत्नी व दोन मुलींसोबत राहणारे पोलीस शिपाई पदावर विनोद काशिनाथ पारधी (३०) २०१० मध्ये वसई पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. शनिवार ६ फेब्रुवारी २०१६ च्या सायंकाळ पासून विनोद पारधी घरी परतले नव्हते. त्यामुळे पारधी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने वसई पोलीस ठाण्यात नोंदवली होती. विनोद पारधी यांच्यावर एका महिला पोलीस सहकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता. या महिला पोलीसाने पारधी यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पारधी यांच्यावर शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विनोद पारधी यांना २५ जानेवारी २०१६ रोजी निलंबीत करण्यात आले होते. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरु होती. त्यामुळे नैराश्येतून पारधी यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास होता. तर पारधी कुटुंबियांनी मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पारधी यांनी आत्महत्या केल्याचा सांगत त्यांच्या मृत्युबाबतच संशय व्यक्त केला होता. दरम्यान, सात महिन्यानंतर पोलीस शिपाई विनोद पारधी यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने वसई पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर विनोद पारधी यांच्या हत्येचा गुंता सोडवताना पोलीस पारधी यांच्या मारेकऱ्याचा कसा शोध लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेचा पुढील तपास वसई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल काकडे स्वत करीत आहेत. (प्रतिनिधी)