शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक महाविद्यालयाला ठोठावला दंड

By admin | Updated: October 12, 2016 04:05 IST

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत भरलेल्या रकमेची पावती आणि प्रवेश रद्द केल्यावर ती रक्कम परत न करणाऱ्या मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयाला

ठाणे : कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत भरलेल्या रकमेची पावती आणि प्रवेश रद्द केल्यावर ती रक्कम परत न करणाऱ्या मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड सुनावला आहे. तसेच प्रवेशाची रक्कम ५० हजार परत करण्याचे आदेशही दिले आहेत.भार्इंदर येथील मेहुल शहा यांनी मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयात सन २००९-१० मध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेताना त्यांच्याकडे महाविद्यालयाच्या वतीने ५० हजार मागितले. त्यांनी ते दिले. मात्र, त्यांना १ हजाराची पावती दिली. याबाबत, त्यांनी विचारणा केली असता ती दुसऱ्या सत्रात दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर, शहा यांना आयकार्ड आणि बोनाफाइड सर्टिफिकेट देण्यात आले. मात्र, आॅगस्ट २००९ मध्ये दुसरीकडे प्रवेश घेण्याच्या कारणास्तव शहा यांनी प्रवेश रद्द करून रक्कम परत मागितली असता ती दिली नाही. मेहुल शहा यांनी याबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी भरलेले शिक्षणशुल्क परत द्यावे, असे निर्देश कॉलेजला दिले. मात्र, रक्कम मेहुल यांना दिली नाही. त्यामुळे त्यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली. मेहुल शहा यांनी रक्कम दिलीही नव्हती आणि प्रवेशही घेतला नव्हता, असे कॉलेजने सांगून तक्रार खोटी असल्याचा दावा केला.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता १ हजाराची पावती आहे. कॉलेजच्या स्पष्टीकरणानुसार ५० हजार जर ट्युशन फीज म्हणून घेतले नसतील, तर प्रवेश दिल्यानंतर दिले जाणारे आयकार्ड आणि बोनाफाइड कोणत्या आधारे दिले, याचा खुलासा केला नाही.