शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच

By admin | Updated: August 9, 2015 23:16 IST

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत

पंकज रोडेकर , ठाणेराजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यात ठाण्याने आघाडी मारली आहे. तसेच ४६ ते ५५ वयोगटांतील व्यक्तींनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसते.गरीब, गरजू व्यक्तींना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता शासनाने १३ जुलै २०११ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यातील गडचिरोली, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबईसह उपनगर या आठ जिल्ह्यांत सुरू केली. तसेच दारिद्रयरेषेखालील आणि दारिद्रयरेषेवरील (पांढऱ्या शिधापत्रिकाधारक वगळून) नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेत यावा, याकरिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्र म) व नॅशनल इन्शुरन्स कं.लि.यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध ९२७ शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील एकूण ४१ रुग्णालयांना या योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे सिव्हील, उल्हासनगर मध्यवर्ती आणि भिवंडी उपजिल्हा या शासकीय रुग्णालयांसह ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ३७ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात ४४७ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याने ६३ लाख ७९ हजार ६०० रुपये येथे जमा झाले आहेत. यासाठी ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांसह मनपा व नगरपालिका क्षेत्रांमधील एकूण ३२ हजार ८५३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी कागदपत्र पूर्ततेअभावी दोन हजार २६८ जणांचे अर्ज नाकारले. तर, तीन हजार ६२६ जणांचे अर्ज काही कागदपत्रां अभावी रद्द केल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रुग्ण लाभार्थी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात सर्वाधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.