शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात १५ इमारतींना धोका

By admin | Updated: May 8, 2017 05:52 IST

नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत

हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत कोसळल्यास जीवित व वित्तहानीला मालकांना जबाबदार धरण्यात आले आहे.पालघर नगर परिषदेने पावसाळा तोंडावर आल्याने तुफानी पाऊस, पूर, वादळात कोसळू शकतील अशा धोकादायक ठरविलेल्या १५ इमारतीत रफीक लुलानिया - सरकारी दवाखान्या जवळ, दामू पाटील चाळ-विमल जगमोहन दामनिया, पंचायत समिती जवळ, झटकल व्हिला, मशिदीच्या पाठीमागे, शांतीलाल जैन चाळ, सरकारी दवाखान्या जवळ, मोडकी चाळ, जय जलारांम टी हाऊस, स्टेशन जवळ, नॅशनल ज्वेलर्स/सागरमल जैन इमारत स्टेशन जवळ, नाकोडा कलेक्शन/रामचंद्र तोरानी,स्टेशन जवळ, शकुंतला शाम कुमार मिश्रा,देविशा चाळ, वजली पाडा, विजय फरसाण मार्ट, स्टेशन जवळ, डॉ.एस पी जैन व श्याम अवसरमोल, यांची इमारत स्टेशन जवळ, बिस्मिल्लाह कॅटरर्स/अल्लाउद्दीन खान यांची इमारत कचेरी रोड, शांतीलाल जैन यांची इमारत राज टॉकिज जवळ, विजय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, कमला पार्क, माहीम रोड, पोषण्णा भुमण्णा संकटोल्लू यांची इमारत, पालघर, प्रवीण हरिश्चंद्र भानू यांची इमारत, टेम्भोडे इ. चा समावेश आहे. मागील ५-७ वर्षा पासून नगरपरिषदे कडून १२ इमारतींना नोटिसी बजावण्यात यायच्या मात्र या वर्षी त्यात ३ इमारतींची भर पडली आहे. प्रत्येक वर्षी नगर परिषद या इमारतीच्या मालकांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचयाती व औद्योगिक अधिनियमानुसार या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या मालक, भोगवटाधारक व वाणिज्य वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र आजपर्यंत त्या आहे तशाच आहेत. पालघर नगर परिषदेला लागूनच असलेल्या धोकादायक इमारतीला मागील अनेक वर्षापासून नोटीस बजावली जात असून या इमारती शेजारी एसटी स्टॅन्ड, भाजी मार्केट,उपविभागीय पोलीस अधिकारी याचे कार्यलय असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीच्या घटनेला सामोरे जाण्याची आपत्ती ओढवू शकते. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?नोटीस बजावण्यामागे त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. ती होत नसेल तर नगरपालिकेने अशी धोकायदायक इमारत पाडून टाकणे अपेक्षित आहे. जर त्यातील नागरिक अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार नसतील तर त्यांना पोलीसी बलाचा वापर करून अन्यत्र देऊन इमारती खाली करून त्या पाडून टाकणे देखील अपेक्षित आहे. परंतु यातील काहीही घडून येत नाही त्यामुळेच नगरपालिका प्रशासन नोटीस बजावून आपली जबाबदारी पूर्ण करीत असली तरी त्यामुळे भविष्यातील दुर्घटना काही टळणार नाही. पालिका फक्त आम्ही नोटीस बजावली होती असे सांगून जबाबदारी झटकू शकते एवढेच.