शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावर ग्राहकांची वाटमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:39 IST

कल्याणच्या पश्चिमेला स्टेशनजवळच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ््या वाटमारी सुरू असून ग्राहकांना पैशाच्या बदल्यात कमी पेट्रोल दिले जात असल्याची ओरड सुरू आहे.

कल्याण : कल्याणच्या पश्चिमेला स्टेशनजवळच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ््या वाटमारी सुरू असून ग्राहकांना पैशाच्या बदल्यात कमी पेट्रोल दिले जात असल्याची ओरड सुरू आहे. एखाद्याच्या लक्षात हा प्रकार आलाच, तर दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटवले जाते. पण लाखो लीटर पेट्रोल-डिझेलच्या बदल्यात सुरू असलेली लूटही तेवढ्याच रकमेची असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.आधीच चिप टाकून पंपावरून कमी पेट्रोल-डिझेल देत सुरू असलेल्या लुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच ही नवी लूटमार ग्राहकांची पिळवणूक करणारी ठरते आहे. खडकपाडा येथे राहणाºया नागरिकाला हा अनुभव आला. ते नेहमी ज्या पंपावरून पेट्रोल भरतात, तेथे वारंवार पन्नास पैसे-रूपयाचे पेट्रोल कमी दिले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुरेशी रक्कम दिल्यानंतरही हा प्रकार होत असल्याने त्यांनी पेट्रोल भरणाºयाकडे विचारणा केली असता त्याने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी थेट पंपाचे आॅफिस गाठले. पण पंपचालकाचा पत्ता नव्हता. एक कर्मचारी आला. त्याने दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. एक ग्राहक तक्रार करीत असल्याचे पाहून दहा-बारा इतर ग्राहकही तेथे जमले आणि त्यांनीही रकमेपेक्षा पेट्रोल कमी भरल्याची ओरड सुरू केली. ही वाटमारी लक्षात आल्याने आपले बिंग फुटेल या भीतीने ग्राहकांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये, यासाठी तेथील कर्मचाºयाने मिनतवाºया सुरू केल्या. या पंपावर इलेक्ट्रानिक मशीन आहे. त्यावर रक्कम सेट केली की तेवढे पेट्रोल येते. पण तशी रक्कम सेट केलीच जात नाही. कर्मचारी अंदाजाने पेट्रोल भरत जातात. प्रत्येक ग्राहकामागे जर ४० पैशांपासून रूपयापर्यंत कमी पेट्रोल दिले जात असेल तर त्यातून रोजच्या लुटीची कल्पना यावी. त्यातून महिन्याचा व वर्षाच्या लुटीचा आकडा थक्क करणारा आहे. या पंपावरील हा अनुभर रोजचाच आणि गेल्या काही महिन्यांचा आहे.