शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील कापड उद्योगावर गोदाम व्यवसायाची मात

By admin | Updated: August 10, 2015 23:35 IST

पारंपरिक व्यवसायामधून शहरात प्रगत झालेल्या कापड व्यवसायाचे नियोजन नसल्याने त्यावर गोदाम व्यवसायाने सध्या मात केली असून शहरातील यंत्रमाग व्यापारी व कापड व्यापाऱ्यांनी आपल्या

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीपारंपरिक व्यवसायामधून शहरात प्रगत झालेल्या कापड व्यवसायाचे नियोजन नसल्याने त्यावर गोदाम व्यवसायाने सध्या मात केली असून शहरातील यंत्रमाग व्यापारी व कापड व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाचे योग्य नियोजन केले नाही तर शहरातील हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.भिवंडीत गेल्या ७० वर्षांपासून यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय सुरू असून यापूर्वी येथे हातमागावर कापड विणून त्याची वाहतूक होड्या व जहाजांमधून होत होती. मात्र, आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध असताना केवळ शहरात व्यावसायिक नियोजन नसल्याने येथील कापड उद्योगावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जुन्या यंत्रमागाची शटललेस यंत्रमागाशी स्पर्धा सुरू झाली आहे. जुन्या यंत्रमागावर कापड कमी विणले जात असून वीजबिल जास्त येते. ही तफावत लपविण्यासाठी अनेक कापड व्यापारी व कापड विणून देणारे यंत्रमागमालक कापड उद्योगात मंदी आल्याची आवई उठवून सरकारी फायदे उठवितात. त्यामुळे काही दिवस हा व्यवसाय तग धरतो. कायमस्वरूपी व्यवसायास संजीवनी मिळविण्यासाठी व्यापारी व लोकप्रतिनिधीदेखील उदासीन आहेत.या व्यवसायाच्या निमित्ताने लोकसंख्येत झालेल्या वाढीने शहराची अवस्था बकाल झाली आहे. कारखान्यात यंत्रमाग चालविणे, कमी वेतन हाती पडणे तसेच वाढीव खर्चाबरोबर इतर खर्चांचा बोजा पडल्याने कामगारांचे प्रमाण कमी झाले. तर गोदामात जास्त पगार आणि वेळेनुसार काम मिळत असल्याने ते गोदामाकडे जास्त वळू लागले.