शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला घाबरूनच सोयीची प्रभाग रचना

By admin | Updated: October 14, 2016 06:31 IST

ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या परिसरात वाढलेल्या लोकसंख्येला विचारात घेऊन येथे नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याने पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठीच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने या ठिकाणची मतदारांची संख्या वाढवून राष्ट्रवादीसोबत रडीचा डाव खेळल्याचा आरोप करून याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण पालिका प्रशासनाने ७ आॅक्टोबरला लॉटरी पद्धतीने जाहीर केले. प्रभागाची रचना करताना प्रशासनाने ५६ हजार लोकसंख्येची सीमारेषा ठरवली. या लोकसंख्येत १० टक्के कमी किंवा अधिक ही मुभाठेवली. त्याचा फटका नवे ठाणे म्हणून वाढणाऱ्या कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर येथे वाढलेल्या लोकसंख्येला बसणार आहे. नव्या ठाण्याच्या प्रभागातील मतदारांच्या संख्येचा निकष १० टक्क्यांनी वाढून ती ६५ हजार झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. परंतु, या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असल्याने सेना आणि भाजपाने प्रशासनाला हाताशी धरून जाणीवपूर्वक अशी चुकीची प्रभागरचना जाहीर केली आहे. नवे ठाणे म्हणून या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याप्रमाणात नगरसेवकांची संख्या वाढवायला होती. (प्रतिनिधी)