शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित भूखंडावरील मालमत्ता हस्तांतरणाचे आदेश

By admin | Updated: August 11, 2015 23:37 IST

महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित

उल्हासनगर : महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित मालमत्ता हस्तांतरीत करा अन्यथा परवाने रद्द करण्याच्या नोटिसा मालमत्ता विभागाने बजावले आहेत. उल्हासनगर महापालिकेने १५ वर्षापूर्वी आरक्षित असलेल्या भूखंडावर काही अटी व शर्तीवर बांधकामास परवानगी दिली आहे. बांधकाम विकासकांनी भूखंड विकसित केल्यानंतर २५ टक्के मालमत्ता पालिकेच्या नावे करून देण्याची जबाबदारी होती. मात्र बिल्डरांबरोबरच पालिकेलाही स्वत:च्याच मालमत्तेचा विसर पडल्याने कोट्यवधींच्या मालमत्तेचा उपभोग हे बांधकाम व्यावसायिक वर्षानुवर्षे घेत आहे. याबाबतची ओरड झाल्यावर मालमत्ता हस्तांतरीत करा, अन्यथा परवाने रद्द करण्याच्या नोटिसा पालिकेला काढाव्या लागल्या आहेत.१८ आरक्षित भूखंडापैकी वुडलँड कॉॅम्पलेक्स मधील एक मजला, इंदिरा गांधी भाजी मार्केट शेजारील इमारती मधील १४ व्यापारी गाळे, अम्ब्रोसिया हॉटेलमागील ८३० चौ.मीटरची जागा, तसेच रिजेन्सी कंपनीने कब्रस्तान व एमएसईबी टॉवर्स साठी ३ एकरची जागा पालिकेच्या नावे करून दिली आहे. इतर १३ भूखंडावरील विकसित कोटयावधीची मालमत्ता गेल्या १५ वर्षापासून बिल्डर वापरत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करून संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेण्याची मागणी पालिका महासभेत झाली आहे.महापालिका मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी आरक्षित भुखंडावरील विकसित मालमत्ता हस्तांतरीत करण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. विशिष्ट मुदतीत बिल्डरांनी मालमत्ता हस्तांतरीत करावी अन्यथा बांधकाम परवाने रद्द करून आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिका सुरू करणार असल्याचा इशारा आयुक्त मनोहर हिरे यांनी दिला आहे. भूखंडावरील कोट्यवधीच्या विकसित मालमत्तेत स्थानिक राजकिय नेत्यांचे हितसंबध गुंतले असून बांधकाम विकासक पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखविणार असल्याची चर्चा आहे. पालिका मालमत्ता विभागाने भूखंडावरील मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करताच बिल्डरांनी पालिकेसह राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. तर समाजमंदिराप्रमाणेच नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. (प्रतिनिधी)