शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांना थेट नद्यांमधून पाणी उचलण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

भातसानगर : पाटबंधारे विभागाने ठाणे व पुणे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना आपले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नद्यांमधून थेट पाणी उचलण्याच्या दिलेल्या ...

भातसानगर : पाटबंधारे विभागाने ठाणे व पुणे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना आपले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नद्यांमधून थेट पाणी उचलण्याच्या दिलेल्या परवानगीस आता स्थानिकांमधून विरोध होत असून पाटबंधारे विभागाच्या या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी एकमुखी फाउंडेशनने तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास, काळू, वैतरणा या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक शेतकरी भाजीपाला, वीटभट्टी यासारख्या व्यवसायातून आपली उपजीविका करतात. शहापूर तालुक्यातील भातसा नदीचे पाणी तर नदीकिनारी असलेल्या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. पुढे याच नदीचे पाणी मुंबईलाही पुरविले जाते. मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात होते. त्यातच जिल्ह्यातील वाढते नागरीकरण तसेच समृद्धी महामार्ग व त्यांना समांतर विकसित होणाऱ्या स्मार्ट सिटीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होऊ शकतो.

स्थानिकांच्या हक्काचे पाणी पळविले जाणार असल्याने शेतीवर आधारित उद्योग तर संकटात येतीलच; शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे. निर्णयाचा ग्रामीण भागावर होणारा दूरगामी दुष्परिणाम पाहता पाटबंधारे विभागाचा हा निर्णय त्वरित स्थगित करण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांना घातले आहे. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रामनाथ दवणे, सचिव विनोद लुटे, कार्याध्यक्ष वसंतकुमार पानसरे, नीलेश डोहाळे, नितीन कुडव आदी उपस्थित होते.