शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेला संधींचे बंधन, ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 23:47 IST

किमान संधींची संख्या तरी वाढवावी : विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने परीक्षा देण्याबाबत संधीची कमाल मर्यादा जाहीर केली आणि ठाण्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. काहींना हा निर्णय योग्य वाटत असला तरी संधीची संख्या आणखी वाढवण्याची त्यांची अपेक्षा आहे. 

आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी बरीच वर्षे करत असतात. स्पर्धा परीक्षेत चांगला रँक मिळवणे हेच त्यांचे एकमेव लक्ष्य असते. त्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मुंबई, ठाणे, पुणेसारख्या शहरात येऊन तयारी करतात. काही विद्यार्थी पार्ट टाइम नोकरी करून परीक्षा देतात. एमपीएससीच्या परीक्षेसोबतच काही विद्यार्थी इतरही विविध शासकीय, बॅंकिंगच्या परीक्षा देतात. याचा अनुभव घेतात. मात्र आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. 

अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

संधीवर मर्यादा घालणे अयोग्यमी आतापर्यंत चार वेळा एमपीएससीची परीक्षा दिली आहे. मात्र अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून दरवेळी अधिकाधिक तयारी करून परीक्षा देतो. परीक्षाही दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे ठरावीक संधीत परीक्षेत चांगला रॅंक मिळवणे कठीण आहे. संधीवर मर्यादा घालणे हे अयोग्य आहे.         दिग्विजय रांजणे, उमेदवार

स्पर्धा पण वाढते आहेमी गेली दोन वर्षे एमपीएससीची तयारी करतो आहे. मात्र परीक्षा एकदाच दिली. परीक्षा देणार्यांची संख्याही वाढतेय आणि स्पर्धा पण वाढतेय. परीक्षेसाठी संधीची मर्यादा घातली ते एखादवेळ योग्य वाटते. पण साधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी अजून द्यायला हव्यात.     रमण यमवारे, उमेदवार

संधींची संख्या काहीशी वाढवावीएमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे कितीही चांगला अभ्यास केला तरी अपेक्षित नंबर मि‌ळवणे जरा कठीण झाले आहे. त्यामुळे संधीबाबत मर्यादा घातल्या हे काही अंशी योग्य असले तरी त्या संधीची संख्या वाढली पाहिजे.     रामेश्वरी पाटकर, उमेदवार

सर्वसाधारण प्रवर्गाचे जास्त नुकसानसंधीची संख्याही कमी आहे. त्यात पूर्व परीक्षेत भाग घेणे किंवा परीक्षेच्या टप्प्यावर अपात्र ठरले किंवा काही कारणाने रद्द झाले तरी ती संधी म्हणून गणली जाणार असेल तर ते चुकीचेच आहे. अशाने सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे तर मोठे नुकसान होणार आहे. याचा फेरविचार व्हावा.      मनाक्षी भोसले, उमेदवार

टॅग्स :thaneठाणेMPSC examएमपीएससी परीक्षा