शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

साखळी उपोषणाच्या २८व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश!

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 10, 2024 16:31 IST

युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले.

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. सुरभी रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केले आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते. गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्यावतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६/ २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने २८ दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे.

टॅग्स :StrikeसंपMedha Patkarमेधा पाटकर