शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ओमींमुळे उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा नाही?

By admin | Updated: February 13, 2017 05:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यास ओमी कलानी यांना मुख्यमंत्र्यांसोबत बसवावे लागणार, हे टाळण्यासाठी व निवडणुकीच्या काळात पुन्हा

सदानंद नाईक / उल्हासनगरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यास ओमी कलानी यांना मुख्यमंत्र्यांसोबत बसवावे लागणार, हे टाळण्यासाठी व निवडणुकीच्या काळात पुन्हा वाद नकोत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरात सभा घेणे टाळल्याची चर्चा रंगली आहे. ओमी टीमचा प्रवेश व भाजपाच्या पोस्टरवरील ज्योती कलानी यांची हजेरी आणि सोशल मीडियात मोदी-पप्पू कलानी यांच्या फोटोंसह फिरणारे पोस्टर यामुळे भाजपावर आधीपासूनच टीका होते आहे. उल्हासनगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर वादग्रस्त ओमी कलानी टीमला पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे राज्यभर टीका होणार हे गृहीत होते. त्या वातावरणात उल्हासनगरच्या सभेत ओमी यांना डावलणे भाजपाला शक्य नाही. सभेवेळी ओमी यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्र्यांना बसवावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा विरोधकांच्या हाती कोलीत दिले जाईल. त्यामुळे फडणवीस यांनी उल्हासनगरात सभा घेण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. ओमी टीमच्या प्रवेशावेळीही मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत, ते त्यामुळेच. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या चौक सभा होतील.