शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

ओमी कालानी भाजपात?

By admin | Updated: August 19, 2016 01:54 IST

लोकसभा, विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपले बळ वाढविण्याचा कित्ता भाजपाने

- सदानंद नाईक, उल्हासनगर

लोकसभा, विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपले बळ वाढविण्याचा कित्ता भाजपाने उल्हासनगरमध्येही गिरवला असून यावेळी त्यांनी थेट ओमी कालानी यांनाच पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीला खिंडार पाडताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाकडून आॅफर येत असल्याच्या वृत्ताला खुद्द ओमी यांनीच दुजोरा दिला असून भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही त्याला विरोध नसल्याने पक्षप्रवेशाचा मार्ग निर्धोक बनला आहे. राज्यमंत्रीपदी संधी मिळालेल्या रवींद्र चव्हाण यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून तो पूर्णत्त्वास जाईल, असा त्यांना विश्वास आहे.राष्ट्रवादीत राहूनही ओमी टीम सध्या स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपत काम करत आहे. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. पालिकेच्या निवडणुका अवघ्या पाच महिन्यांनी होतील. शिवसेना-भाजपा युतीने गेले दशकभर उल्हासनगर पालिकेच्या सत्तेपासून कालानी दूर ठेवले. शहरात भाजपापेक्षा शिवसेना वरचढ आहे. कालानी यांना भाजपात प्रवेश दिल्यास पालिकेत भाजपाची स्थिती भरभक्कम होईल. सिंधी राजकारणावर पक्षाचा वरचष्मा होईल. राष्ट्रवादीत कालानी समर्थक २० नगरसेवक आहेत. तसेच काही अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबाही कालानी यांना आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान बळकट करणे, सिंधी राजकारणावर कब्जा करणे आणि शिवसेनेला धडा शिकवण्याचे भाजपाचे मनसुबे एकाचवेळी पूर्ण होतील, याचा अंदाज आल्यानेच भाजपाने गळ टाकल्याची चर्चा आहे. ओमी पालिका निवडणूक डोळ््यापुढे ठेवून सहा महिन्यांपूर्वी आपल्या ३० पेक्षा मोठ्या टीमची घोषणा केली. गेल्या आठवड्यात निवडणूक कोअर कमिटीही स्थापन केली. त्याच्या अध्यक्षपदी आमदार ज्योती कालानी आहेत. ज्योती आणि ओमी यांनी पप्पू कालानी यांच्यापासून दूर गेलेल्या-पण राजकारणावर, समाजकारणावर प्रभाव असलेल्या जुन्या-जाणत्या नेत्यांचे घर वापसी अभियान राबविले आहे. त्या हाकेला दर्शनसिंग लबाना, लक्ष्मण पमनानी, मोहन गोडो यांच्यासह अनेकांनी ओ दिल्याने ही टीम भक्कम झाली. पक्षातील नाराज नेत्यांसह नगरसेवकांनी ओमी टीमला सक्रीय पाठिंबा दिला आहे.ओमी टीमला मिळणारा प्रतिसाद, ज्योती यांनी वेगवेगळ््या विषयांवर उठवलेले रान पाहूनच भाजपाने सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी त्यांना प्रवेशाची आॅफर दिल्याचे दिसते.सेनेपेक्षा सरस स्थिती होण्याची शक्यतासध्या पालिकेत शिवसेना २१, राष्ट्रवादी २० आणि भाजपा ११ असे पक्षीय बलाबल आहे. ज्योती कलानी आणि ओमी यांनी गेल्या काही काळात पक्षाचे बळ वाढवतानाच कलानी या नावाच्या करिष्म्याचा वापर करत आपले बळ पुन्हा एकत्र केले होते. पप्पू कालानी यांच्या चांगल्या कामांची पुण्याई वापरत त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले होते. त्यांचा राजकीय दबदबा कायम असल्याने कालानी जर भाजपामध्ये आले, तर शिवसेनेपेक्षा भाजपाचे स्थान मजबूत होईल, हे गृहीत धरून भाजपाने त्यांना आॅफर दिल्याचे समजते. काम पाहूनच निर्णयओमी टीम शहरात सक्रीय आहे. आमच्या टीमचे काम पाहून भाजपाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रवेशाच्या आॅफर दिल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या धोरणानुसार आमचे काम सुरू आहे. पण शहराचे हित पाहून योग्य वेळी निर्णय घेऊ. - ओमी कालानी, राष्ट्रवादीचे युवा नेता आणि अपक्ष नगरसेवक निर्णय हिताचाचपक्षाच्या आदेशानुसारच भाजपाचे पदाधिकारी काम करतात. ओमी कालानी यांना वरिष्ठांनी पक्षात प्रवेश दिला, तर आम्ही कोणतीही नाराजी व्यक्त करणार नाही. वरिष्ठ नेते पक्षाच्या-शहराच्या हिताचाच निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. - कुमार आयलानी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार