शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये विवाह नोंदणीची संख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:21 IST

धास्ती लॉकडाऊनची

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पहिल्या लॉकडाऊनमध्ये नियोजित विवाह सोहळे रद्द झाल्यानंतर उपवर वर-वधू हे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळले होते. त्यामुळे असे विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसाला ३५ ते ४० च्या आसपास गेली होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत असून ही संख्या कमी झाल्याचे निरीक्षण जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने नोंदविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि एप्रिल, मे महिन्यात ठरविलेले विवाह सोहळे अनेकांना रद्द करून पुढे ढकलावे लागले. अशांनी नंतर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिल्याने ही संख्या वाढत गेली. लॉकडाऊन आधी दिवसाला कधी ५, कधी १० तर एखादा अनोखा मुहूर्त असेल तर अगदी २०-२२ विवाह सोहळे पार पाडत. परंतु, लॉकडाऊनमुळे ही संख्या दुपटी-तिपटीने वाढू लागली. परंतु, या लॉकडाऊनमध्ये उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालयातील नियोजित विवाह सोहळे तर रद्द झालेच परंतु, कोरोनाच्या धास्तीने नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्यादेखील घटली, असे विवाह अधिकारी अनिल यादव यांनी सांगितले. या लॉकडाऊनमध्ये आता ही संख्या अर्ध्यावर आली असून १०-१५-२० अशा संख्येने विवाह सोहळे होत आहेत.

५० जोडपी विवाहबद्धnगुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या भीतीने विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी जास्त संख्येने जोडपी हजर होती. तब्बल ५० जोडपी विवाहबंधनात अडकली, अशी माहिती यादव यांनी दिली.nराज्य सरकारने २२ एप्रिलपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात केवळ १५ टक्के उपस्थिती हाेती.nकार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर या वाढलेल्या संख्येमुळे गुरुवारी काहीसा ताण होता.