शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अनिवासी भारतीय महिलेला लाखोंचा गंडा

By admin | Updated: February 21, 2017 03:52 IST

ठाण्याच्या कोलबाड भागातील अनिवासी भारतीय (सध्या रा. कुवेत) ५८ वर्षीय महिलेने ठाण्यातील अ‍ॅन्थोनी फर्नांडिस या मानलेल्या

ठाणे : ठाण्याच्या कोलबाड भागातील अनिवासी भारतीय (सध्या रा. कुवेत) ५८ वर्षीय महिलेने ठाण्यातील अ‍ॅन्थोनी फर्नांडिस या मानलेल्या भावाला सदनिका खरेदीसाठी नियुक्त केले होते. याचाच गैरफायदा घेऊन फर्नांडिस दाम्पत्याने सुमारे ७० लाख रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तक्रारदार महिला मूळ डोंबिवलीची रहिवासी आहे. महाविद्यालयात असल्यापासूनच्या मैत्रीमुळेच त्यांनी अ‍ॅन्थोनीला भावाप्रमाणे मानले आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे मलेशिया, कुवेत असे नेहमीच परदेश दौरे असल्यामुळे ठाण्यात घर घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. अखेर, त्यांनी ही जबाबदारी आपले कौटुंबिक संबंध असलेल्या फर्नांडिस दाम्पत्यावर सोपवली. त्यानुसार, दोन सदनिका तो त्यांना घेऊन देणार होता. त्यापोटी त्याने ९ ते १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे ७० लाखांची रक्कम घेतली. त्याने सदनिकाखरेदी केल्याचे भासवून त्याची कागदपत्रेही ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील दुयम निबंधक कार्यालयात बनवली. यासाठी तक्रारदार महिलेच्या नावाने सदनिका विकत घेण्याऐवजी अ‍ॅन्थोनीने स्वत:च्या नावाने ती घेतली. ही महिला आणि बिल्डर सुरेश म्हात्रे यांच्याशी व्यवहार करून ते पैसे किंवा सदनिकाही त्याने दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने अखेर ठाणे न्यायालयाला याबाबतची माहिती देऊन तक्रार दाखल केली. ठाणे न्यायालयाने राबोडी पोलिसांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅन्थोनी आणि रेजिना या दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून लवकरच या दोघांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)